राजापुरात शिवसेना शिंदे गटाचा पुन्हा एकदा उबाठा शिवसेनेला दणका

वाल्ये पुर्ववाडीतील शेकडो ग्रामस्थांचा शिंदे गटात प्रवेश

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील वालये पूर्ववाडी येथील शेकडो शिवसैनिकांनी मंगळवारी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आणि गावच्या विकासासाठी या सर्व उबाठा गटातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची पक्षात विविध पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक आण्णा सामंत तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेनेचे युवा नेते किरण उर्फ भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना राजापूर तालुकाप्रमुख अशफाक हाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व वाल्ये पूर्ववाडी तील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख अशफाक हाजू यांनी उपस्थित सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. वालये गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही यावेळी हाजू यानी या प्रवेशकर्त्याना दिली. या प्रवेश केलेल्या काही कार्यकर्तेना पक्षात तात्काळ विविध पदावर नियुक्ती देण्यात आली. वालये पूर्ववाडी शाखाप्रमुखपदी महेश भिकाजी तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अन्य पदांवरही पुढील कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये रवींद्र जयराम तावडे, प्रमोद दशरथ तावडे, शिवाजी सिताराम तावडे, राजेंद्र गुरव, उदय वसंत चव्हाण, एकनाथ राजाराम तावडे, मनोहर वासुदेव तावडे, संतोष वसंत तावडे, अनंत नागू तावडे आदींपदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रवेश कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.