गुहागर आरोग्य विभाग पथकाची दमदार कामगिरी
नैसर्गिक आपत्ती आणि साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज
गुहागर प्रतिनिधी:
मौजे पांगारी तर्फे हवेली येथील घरावर आंब्याचे झाड पडून जखमी झालेल्यांना घरात जाऊन तळवली प्रा आ केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी उपचार केले.
सध्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे पाणीपुरवठा आणि पाणी शुद्धीकरणावर परिणाम होऊ शकतो आणि जलजन्यआणि कीटकजन्य आजारांची साथ पसरू नये आणि आरोग्य सेवांवर परिणाम होऊ नये या साठी तालुका आरोग्य विभाग गुहागर सज्ज झाले आहे.
प्रत्येक प्रा आ केंद्रात साथरोग नियंत्रणासाठी कक्ष स्थापन करण्यात आले असून संपर्क पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे. जलजन्य आणि कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवला आहे. श्वान विंचू आणि सर्प दंशावरील लसीचा आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याची सूचना देण्यात आल्या आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सज्ज राहण्याची सूचना देण्यात आली आहे. सर्व रुग्णवाहिका चालू आहेत.
पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करण्याची सूचना संबंधित ग्रामपंचायतीना देण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना ग्रहभेटी आणि साथरोग सर्वेक्षण नियमित करण्याची सूचना देण्यात आली आहे. ओ टी टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.












