चौकुळ येथील वादळग्रस्तांना आ. दीपक केसरकर यांच्याकडून तातडीची मदत

तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्यासह शिवसैनिकांचा मदतकार्यात पुढाकार

आंबोली । प्रतिनिधी : चौकुळ 

येथील बेरडकी भागात झालेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी शिवसेना आणि आमदार दीपक केसरकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने व आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या वादळग्रस्त व नुकसानग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच आर्थिक स्वरूपात तातडीची मदत सुपूर्द करण्यात आली.

आमदार दीपक केसरकर यांनी स्वतः चौकुळ येथील घटनास्थळाला भेट देऊन वादळामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. बाधित कुटुंबांशी संवाद साधत त्यांनी प्रशासकीय पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी तहसीलदारांना तातडीने पुढील कार्यवाही करून नुकसानभरपाई देण्याच्या सूचना केल्या, जेणेकरून पीडित कुटुंबांना शक्य तितक्या लवकर शासकीय मदत उपलब्ध होऊ शकेल.

या पाहणी दौऱ्यादरम्यान आणि मदत वाटपाच्या वेळी सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शाखाप्रमुख अभिजीत मेस्त्री, युवा सामाजिक कार्यकर्ते आनंद (नंदू) गावडे, बबन रेडकर, धनंजय गावडे, निखिल गावडे, यश गावडे, साई नाईक, उत्तम नाईक यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत मोलाचे योगदान दिले.

आमदारांच्या या तत्परतेमुळे आणि शिवसैनिकांच्या धावून येण्यामुळे चौकुळमधील नुकसानग्रस्त कुटुंबांनी आभार व्यक्त केले आहेत.यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय यंत्रणेने तातडीने पंचनामे करून बाधित नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.