मंडणगड | प्रतिनिधी : मतदार संघाचे विषेतातः मंडणगड तालुक्याच्या विकासाची भुमीका मांडणाऱ्या प्रत्येक घटकांच्या मागे मी ठामपणे उभा असल्याची भुमीका आमदार योगेश कदम यांनी 12 ऑगस्ट 2023 रोजी भिंगळोली येथील कार्यक्रमात मांडली. मंडणगड तालुका पत्रकार संघाचेवतीने यादव चँरीटी ट्रस्टचे श्रीकृष्ण सभागृहात आयोजीत कऱण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व मान्यवरांचे गौरव सोहळ्याचे उद्घाटन श्री. योगेश कदम यांच्याहस्ते कऱण्यात आले. या कार्यक्रमास तहसीलदार तानाजी शेजाळ, पत्रकास संघाचे अध्यक्ष विनोद पवार, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, नगरपंचायत विरोधीपक्ष गटनेता विनोद जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार योगेश कदम पुढे म्हणाले की, मंडणगड तालुक्यातील पत्रकारांनी सर्वसामान्यांचे प्रश्न जगासमोर आणले असून केवळ समस्या मांडण्यापुरती भुमीका न मांडता प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा कऱण्याची येथील माध्यमकर्मीची कार्यपध्दती निश्चीतच कौतकास्पद व पत्रकारितेच्या मुळ तत्वांचे अनुपालन करणारी आहे.
पायाभुत सुविधांच्या निर्मीतीसह तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लावणार असून येथील तरुणांना स्थानीक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी व येथून महानगरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी तालुक्याचा रखडलेला एम.आय.डी.सी. चा प्रश्न मार्गी लावून तालुक्यात हा प्रकल्प आपण लवकरच कार्यान्वीत करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. यावेळी पत्रकार संघाचेवतीने आमदार श्री. योगेश कदम यांचा शाल, पुष्पगुच्छ व शिवप्रतिमा भेट देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार, उपाध्यक्ष विजय जोशी, कार्याध्यक्ष प्रशांत सुर्वे, सचिव व कायदेशीर सल्लागार दयानंद कांबळे, खजिनदार सचिन माळी, समन्वयक विजय पवार यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव व कायदेशीर सल्लागार दयानंद कांबळे व खजिनदार सचिन माळी यांनी केले.












