तळेरे:- *मुंबईत शिवडी येथील कोळी समाज हाॅलमध्ये ९४ वी श्रीदेव कोळंबा जत्रा संपन्न झाली.*
मुंबईत अतिवृष्टी असूनही चारशे ते पाचशे नांदगाव विकास मंडळाचे सदस्य व कोळंबा भक्त उपस्थित होते. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार प्रमोद जठार, नगरसेवक किरण तावडे व देविदास लोखंडे यांनी मुंबईतील ९४ व्या कोळंबा जत्रौत्सवात सहभागी झालेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन केले. तसेच गुणवंत विद्यार्थी दहावी शालांत परीक्षेत ९६% गुण मिळवून प्रथम आलेली कुमारी मृण्मयी प्रज्ञा प्रसाद रेवडेकर, कुमारी भक्ती वैभवी विनोद बिडये, कुमारी मृणाली मानसी मारुती मोरये, कुमार कृष्णा रश्मी राजेश रेवडेकर, कुमार सोहम पूजा श्रीकृष्ण बोभाटे, कुमार हर्षद शिल्पा जगदीश बिडये, बारावी वाणिज्य शाखेत कुमार अमोघ प्रसन्ना प्रमोद कुडतरकर आणि एम्. बी. ए. (फायनान्स मॅनेजमेंट) सौ. प्रियांका संदेश शिरसाट यांना रोख रक्कम, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि श्रीदेव कोळंबा प्रतिमा देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक श्री. विवेक नामदेव माणगांवकर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी बहरीन येथे झालेल्या १७ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय आशियायी कबड्डी स्पर्धेत भारताला “सूवर्णपदक” मिळवून देणारी नांदगावची ‘सुवर्णकन्या’ कुमारी सेरेना मेघाली सचिन म्हसकर हिला रोख रक्कम ₹ २,५००/- शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, श्रीदेव कोळंबा प्रतिमा भेट देऊन, तिच्या वडिलांचाही सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक म्हणून रविंद्र बाळकृष्ण म्हसकर, प्रकाश यशवंत साळुंके आणि विष्णू लक्ष्मण रेवडेकर यांचाही अध्यक्ष व पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर वयोवृद्ध कार्यकर्ते नारायण हरी मोरये यांनी सामुदायिक गार्हाणा श्रीदेव कोळंबा चरणी घालून आलेल्या सर्व ग्रामस्थांना-भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.
ही जत्रा संपन्न करण्यासाठी सतीश कृष्णाजी मोरये, सूर्यकांत मारुती रेवडेकर, मनोहर आत्माराम बिडये, नूतन महादेव मोरये, संगीता मनोहर रेवडेकर, वसंत शांताराम राणे, संजीव मनोहर शारसाट, श्रीकृष्ण आत्माराम मोरये,संजय तांबे, केशव शिवराम तांबे, राजेंद्र शंकर महाडेश्वर, दिवाकर महादेव मोदी, जगदीश चंद्रकांत बिडये, बिपीन शशिकांत कुडतरकर, अक्षय रविंद्र रेवडेकर, तुषार कदम, शेरु सय्यद, इ. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.













