“कुडाळदेशकर” वार्षिक पूर्ण अंकाचा प्रकाशन सोहळा रविवार ५ जुलै, २०२६ रोजी अ. भि. गोरेगांवकर इंग्लिश हायस्कुल, गोरेगाव (पश्चिम) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला..!
सदर कौटुंबिक कार्यक्रमाला सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ञ डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई, सारस्वत बॅंकेचे माजी उप-कार्यकारी संचालक आनंद खोत, बँकिंग तज्ञ अजय तेंडोलकर, स्तंभलेखक पत्रकार अनंत सामंत वसई, ॲड. नारायण सामंत कायदे तज्ञ, उद्योजक सुनील देसाई व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगरत्न डॉ. विवेक देसाई प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते..! ह्या हृद्य सोहळ्यात सतीश तिरोडकर, उमाकांत महाजन, भाग्यश्री प्रभू-तेंडोलकर, सुरेंद्र नायक(सुरा भटजी), प्रमोद देसाई, डॉ.हेमचंद्र सामंत, दर्शना प्रभूतेंडोलकर, सुहास आजगांवकर, पुनम नेरुरकर, योगिता आजगांवकर इत्यादी लेखक, विचारवंत, कवियत्री, साहित्यिक यांची प्रमुख उपस्थिती होती..!
गौड ब्राह्मण समाज, गोरेगांव शाखेची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे होत असलेली वाटचाल, आरोग्य शिबिरे, विविध कला क्रीडा स्पर्धा, वधू-वर मेळावे,स्नेह संमेलने यशस्वी करण्यासाठी ज्ञातिबांधव घेत असलेली मेहनत यशामागचे मुख्य आहे..! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख अविनाश माईणकर यांनी केली.. ”कुडाळदेशकर” वार्षिक अंकाचे संपुर्ण विश्लेषण कार्यकारी संपादक मनीष दाभोळकर यांनी केले..! आपल्या मनोगतात ते म्हणाले “ह्या अंकातील विविध लेखांचे कवितांचे विषय अतिशय संवेदनशील, सामाजिक व नैतिक जाणीवेने भरलेले असुन माहितीपूर्ण आहेत.. असे लिखाण व कार्य फक्त सृजनशील व्यक्तींकडूनच होऊ शकते..!” त्यांनतर प्रमुख पाहुण्यांनी आपापले मौलिक विचार मांडले.. कु. भाग्यश्री तेंडोलकर (२२) ह्या जागतिक दौरा केलेल्या उभरत्या पिढीच्या प्रातिनिधिक विचारांनी व विदेशी अनुभवांनी उपस्थितांची मने जिंकली..! उद्योगरत्न डॉ.विवेक देसाई यांनी कौतुकाची थाप मारून सांगितले की संस्थेचे उपक्रम चांगले सुरू आहेत पण बॅलन्सशीट अजून कमजोर आहे.. त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत..! कार्याध्यक्ष प्रवीण प्रभू यांनी अंकातील सर्व लेखक कवींचे, उपस्थित मान्यवरांचे आणि जाहिरातदारांचे हार्दिक आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली..!













