देवगड तालुक्यात ३३ मिमी पावसाची नोंद; घरावर सुपारीचे झाड कोसळून नुकसान

देवगड, ता. ७ : देवगड तालुक्यात मंगळवारी ३३ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान १,१६३ मिमी इतके झाले आहे.

दरम्यान, मौजे नाडन येथे मालती मधुकर बाईत यांच्या राहत्या घरावर सुपारीचे झाड कोसळल्याने छतावरील पत्र्यांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

घटनेचा पंचनामा करून नुकसानाचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.