मालवण | प्रतिनिधी : गेले तीन दिवस बेपत्ता असलेले मालवण घुमडे येथील सुरेश ज्ञानोबा बाईत (वय 65) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी कुंभारमाठ येथे पाणी साचलेल्या एका मोठया खड्ड्यात सापडून आला.
सुरेश बाईत हे 4 जुलै रोजी दुपारी 2 वाजता कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेले. ते पुन्हा घरी आलेच नाही. त्यांचा शोध घेतला असता कोणताही शोध न लागल्याने त्यांचा मुलगा सिद्देश सुरेश बाईत यांनी वडील बेपत्ता असल्याची माहिती मालवण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार बेपत्ता नोंद करून पुढील तपास व शोधकार्य सुरु होते.
सुरेश बाईत यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी कुंभारमाठ येथे एका जुन्या दगडी खाणीच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात सापडून आला. याबाबत सुरेश यांचा मुलगा याने खात्री केली. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार पंचनामा शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
फोटो : सुरेश बाईत













