रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी नीलम जोशी

सचिवपदी प्रविणा शिंदे, खजिनदारपदी प्रदीप सामंत

नूतन कार्यकारणीचा १० जुलै रोजी पदग्रहण सोहळा

अमित खोत | मालवण : रोटरी क्लब मालवण वर्ष २०२६-२७ नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा शुक्रवार १० जुलै २०२६ रोजी ‘समर्थ मंगल कार्यालय’ कोळंब येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि पदग्रहण अधिकारी म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते रोटरी क्लब मालवण अध्यक्ष नीलम जोशी, सचिव प्रविणा शिंदे, खजिनदार प्रदीप सामंत यांसह नूतन कार्यकारिणीला पदभार सोपवला जाईल. या प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल अभिषेक माने यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

नूतन कार्यकारिणी : बोर्ड ऑफ डायरेक्टर २०२६-२०२७

 

प्रेसिडेंट नीलम जोशी, व्हाईस प्रेसिडेंट उमेश सांगोडकर, सेक्रेटरी प्रविणा शिंदे, जॉईंट सेक्रेटरी तनिष्का कासवकर, ट्रेझरर प्रदीप सामंत, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट पंकज पेडणेकर, क्लब सर्व्हिस सुहास ओरसकर,

कम्युनिटी सर्व्हिस डॉ. लीना लिमये, व्होकेशनल सर्व्हिस ऋषिकेश पेणकर, इंटरनॅशनल सर्व्हिस डॉ. अजित लिमये, युथ सर्व्हिस अभय कदम, रोटरी फाउंडेशन प्रदीप जोशी, मेंबरशिप डेव्हलपमेंट बाळू तारी, क्लब ॲडमिन महादेव पाटकर, क्लब बुलेटिन सुविधा तिनईकर,

सार्जंट ॲट आर्म्स कमलिनी प्रभू, स्पोर्ट्स चेअरमन अमेय पारकर, क्लब ट्रेनर भाऊ साळगावकर, लिटरसी प्रमोशन, रमाकांत वाक्कर, क्लब फेलोशिप उमेश हळदणकर या नूतन कमिटीकडे रोटरी क्लब मालवणच्या वर्ष २०२५-२६ चे अध्यक्ष पंकज पेडणेकर, सचिव रंजन तांबे आणि खजिनदार चंद्रशेखर पेंडूरकर हे आपली जबाबदारी सुपूर्द करतील.

 

रोटरी क्लब मालवणने या सोहळ्याच्या निमित्ताने एक आदर्श आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना व हितचिंतकांना आवाहन करण्यात आले आहे की, नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना कोणतेही गुलाबपुष्प, पुष्पगुच्छ किंवा रोपे आणू नयेत. त्याऐवजी २०० पानी वह्या भेट म्हणून द्याव्यात. जमा झालेल्या या सर्व वह्या गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी वितरित केल्या जाणार आहेत.