चौके येथे जेष्ठ नागरिकासाठी आरोग्य शिबीर संपन्न 

52 जेष्ठ नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

 चौके – प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग- सहाय्यक आयुक्त कार्यालय सिंधुदुर्ग श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ चौके उपशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने चौके येथील भ ता चव्हाण,म.मा.विद्यालयाच्या जयप्रकाश हॉलमध्ये गुरुवारी आरोग्य शिबिर संपन्न झाले सदर शिबिरात पंचक्रोशीतील सुमारे 52 ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

 

या शिबिराप्रसंगी चौके सरपंच शिवप्रसाद चौकेकर, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी श्रीमती सुगंधा देवरुखकर मॅडम, चौके पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष शिवाजी पोफळे, चौके हायस्कूल स्थानिक समितीचे अध्यक्ष बिजेन्द्र गावडे, ज्येष्ठ नागरिक सल्लागार सदाशिव गावडे गुरुजी, ज्येष्ठ नागरिक खजिनदार नाना देसाई,माजी सरपंच पी के चौकेकर,सुरेश चौककर, विजय चौककर,रमेश चव्हाण,मधुकर चव्हाण यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

 

ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अनेक शारीरिक आजार उदभवतात योग्य निदान न झाल्याने आजारांच्या समस्या वाढत राहतात. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी श्रीमती सुगंधा देवरुखकर यांनी केले.याप्रसंगी शिवाजी फोफळे,बिजेंद्र गावडे, सदाशिव गावडे गुरुजी,सरपंच शिवप्रसाद चौककर यांनी जेष्ठ नागरिकांना निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

सदर शिबिरात उच्च दाब तपासणी,रक्त तपासणी,मधुमेह तपासणी,नेत्र तपासणी,ई जीं सी तपासणी अशा तपासणीचा आणि आयुष्यमान कार्ड काढणे अशाप्रकारे चौके पंचक्रोशीतील सुमारे 52 ज्येष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

 

या शिबिरात डॉ. गणेश शिंदे कॅम्प व्यवस्थापक श्रीमती सुजाता रावराणे, सिस्टर प्रियांका पांगम, अनुष्का ठाकूर,अनुष्का ठाकूर,लॅब टेक्निशियन नंदू सावंत, लॅब सिस्टर उज्वला नाईक, आरोग्यमित्र संकेत जाधव, नेत्र तपासणीस सौरभ बालम चौके प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी माया इन्सुलकर अनघा गावडे ,आशा स्वयंसेविका यांनीही सहभाग घेतला.