सांगेली माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त वृक्षारोपण संपन्न; ५० रोपांची लागवड

सावंतवाडी:पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून निसर्गाला साथ देणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहाचे निमित्त साधून सांगेली येथील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात ५० नवीन रोपांची लागवड करण्यात आली. सांगेली येथील गिरिजानाथ दुग्ध सहकारी संस्थेच्या वतीने या उदात्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

“झाडे लावा झाडे जगवा” या उक्तीचा संदेश देत विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. सदर वृक्षारोपण सिंधुदुर्गचे माजी डीवायएसपी दयानंद गवस यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, दुग्ध संस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, सांगेलीचे सरपंच लवु भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर, सागर सांगेलकर, रमाकांत राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, पोलीस पाटील विठ्ठल डोईफोडे आणि माजी प्राचार्य रामचंद्र घावरे उपस्थित होते.

तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ पु. राऊळ, सचिव विश्वनाथ राऊळ, उपाध्यक्ष सुरजी राऊळ, महेश रेमुळकर, वामन नार्वेकर, गुरुप्रसाद राऊळ, वसंत रेमुळकर, विनायक सावंत, दिनेश सावंत, बाळा सरगांवकर, राकेश देवकार, बाळा राऊळ, आनंद राऊळ, महेश राऊळ आणि रोहित राणे, भास्कर कोचरेकर यांच्यासह हायस्कूलचे शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपण करून केवळ झाडे न लावता ती जगवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.