सतत वीज गायब असल्याने ग्रामस्थ त्रस्त कायमस्वरुपी वायरमन मिळण्यासाठी केली मागणी
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील वहाळमध्ये सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि व्यापारी वर्ग या समस्यामुळे अक्षरक्ष: त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेवटी ग्रामस्थानी कायमस्वरूपी वायरमन मिळावा आणि वीज गैरसोय होऊ नये यासाठी सावर्डे येथील महावितरणच्या शाखा अभियंता श्री. खोडे यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी चांगलाच जाब विचारला.
गेले काही दिवस सतत पडणारा पाऊस आणि त्यातच नेहमी गायब होणारी वीज यामुळे वहाळ मधील ग्रामस्थ आणि व्यापारी अक्षरशः त्रस्त झाले होते. वीज गायब असल्यामुळे व्यापारी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर ग्रामस्थ सुद्धा सततच्या विज गायब असल्यामुळे खवळले होते. त्यामुळे व्यापारी व ग्रामस्थ या सर्वांनी मिळून या समस्येवरती तोडगा काढावा आणि वहाळसाठी कायमस्वरूपी वायरमन मिळावा याकरता सावर्डे येथील महावितरण कार्यालयाचे शाखा अभियंता श्री खोडे यांना निवेदन दिले आणि चांगलेच खडसावले. वहाळ परिसरातील सर्वच गावांमधील वीज लवकर चालू करावी असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. हे निवेदन देताना खांडोत्री गावचे उपसरपंच अमोल कोदारे, अशोक पवार, प्रकाश शिरकर, संदीप वनगे, समीर भागडे, शेख, नरेंद्र पालकर आणि प्रदीप कुंभार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो फाईल- सीपीएन१०-७













