रोटरी क्लब ऑफ चिपळूणचा रविवारी पदग्रहण सोहळा

उद्योजक शैलेश टाकळे नूतन अध्यक्ष, सचिवपदी रोहन देवकर तर खजिनदारपदी मंगेश गोंधळेकर

चिपळूण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ चिपळूण हा नेहमीच सामाजिक व समाजोपयोगी कार्यक्रमात अग्रेसर असलेला क्लब होय. या क्लबच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वर्षी नवीन कार्यकारणी कार्यभार सांभाळत असते, त्याचप्रमाणे १ जुलै २०२६ रोजी नवनिर्वाचित कार्यकारणी यांनी पदभार स्वीकारलेला आहे. रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी शैलेश टाकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच सचिवपदी रोहन देवकर व खजिनदारपदी मंगेश गोंधळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष सुनील रेडीज, सचिव अभिजीत चव्हाण आणि खजिनदार रोहन देवकर यांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर नवीन कार्यकारणीने चिपळूणकरांना आवाहन केले आहे की, समाजोपयोगी उपक्रम आम्हाला सुचवा व जे उपक्रम आम्हाला यथाशक्ती जमेल ते उपक्रम आम्ही निश्चितपणे पार पाडू. नवीन कार्यकारिणीचे पदग्रहण समारंभ रविवारी दि. १२ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता राधाताई लाड सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०२७-२८ चे रोटरीयन विक्रांतसिंह कदम आणि रोटरीयन असिस्टंट गव्हर्नर बिपिनचंद्र गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चिपळूण तर्फे करण्यात येत आहे.