चिपळूण (वार्ताहर) : दलवाई हायस्कूल मिरजोळीमध्ये मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गीतगायन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक रोहित जाधव, ज्येष्ठ शिक्षिका सौ समिधा डांगे, सौ मृणाली जाधव, जेष्ठ शिक्षक मोहन पवार, श्री. मते तसेच व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता सातवी ब च्या विद्यार्थिनींनी व इयत्ता नववी व च्या विद्यार्थ्यांनी गीत गाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यानंतर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण प्रशालेचे इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक भैय्या पाटील यांनी केले. छोट्या गटांमध्ये प्रथम क्रमांक कुमारी सारा सचिन जाधव इयत्ता सहावी, द्वितीय क्रमांक कुमार मिहीर विजयानंद भुवड. इयत्ता सातवी अ, तर तृतीय क्रमांक ईश्वरी चिले इयत्ता पाचवी या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर मोठ्या गटांमध्ये कुमारी दिव्या कळमुंडकर इयत्ता आठवी ब व द्वितीय क्रमांक कुमारी गार्गी दळवी इयत्ता आठवी अ या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यानंतर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. मृणाली जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील हृदयस्पर्शी असे प्रसंग विद्यार्थ्यांसमोर कथन केले.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी आपल्या ओघवत्या भाषण शैलीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या एकविसाव्या शतकातही आपल्याला कसे उपयुक्त आहेत आणि ते आपणही आपल्या जीवनात अंगीकारावेत असे विद्यार्थ्यांना आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी ब मधील कुमारी आर्या मेस्त्री, प्रस्ताविक कुमारी तनिषा जाधव व आभार प्रदर्शन कुमारी तनिषा मोहिते यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक मोहन पवार व सौ. साक्षी कदम यांनी केले.











