बांदा येथे १७ रोजी ‘आषाढ महोत्सव

‘सूर्यास्त सूर्योदय’ या संयुक्त दशावतार नात्याप्रयोग

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नरचे आयोजन 

 

बांदा : प्रतिनिधी

 

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘आषाढ महोत्सव २०२६’ चे शानदार आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून शुक्रवार १७ जुलै रोजी रात्री ७ वाजता ‘सूर्यास्त सूर्योदय’ या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कट्टा कॉर्नर येथील आनंदी मंगल कार्यालय येथे महोत्सव संपन्न होणार आहे. यावेळी श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांच्या विशेष सहकार्याने नाट्यप्रयोग होईल. या संयुक्त नाट्यप्रयोगात प्रतिक कलिंगण, चंद्रकांत गावडे, प्रशांत मयेकर, गौरव शिर्के, सुयश ठाकूर, उदय मोर्ये, योगेश कोंडुसकर, सागर गावकर, नारायण आशयेकर, महेंद्र कुडव, मोरेश्वर सावंत, गोट्या येरागी, सुधीर तांडेल हे कलाकार आहेत.

 

त्यांना हार्मोनिअम मयुर गवळी, मृदंगमणी पियुष खंदारे आणि झांज वादक म्हणून विनायक सावंत हे साथसंगत करणार आहेत. बांदा परिसरातील दशावतार रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर यांच्या वतीने करण्यात आले आहे.