राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक मुश्ताक नाखवा यांचे निधन

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका एज्युकेशक सोसायटीचे संचालक व राजापुरातील ठेकेदार मुश्ताक अब्दुल्ला नाखवा (६२) यांचे रविवार दिनांक १२ जुलै रोजी ह्दविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राजापुरातील पाच मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष शौकत नाखवा यांचे ते बंधू होत.
राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी नाखवा हे २१ वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते. संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. संस्थेच्या विविध विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने संस्थेचे, सहकाऱ्यांचे व समाजाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांच्या पश्चात पत्नी एक विवाहित मुलगी, मुलगा, जावई असा मोठा परिवार आहे.