कणकवली : कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी खासदार नारायण राणे यांचे आशीर्वाद घेत आगामी सामाजिक व विकासकामांबाबतही चर्चा केली.

यावेळी खासदार नारायण राणे तसेच नीलमताई राणे यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी अवधूत मालणकर, दिवाकर मुरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भेटीचे वातावरण अत्यंत आपुलकीचे व स्नेहपूर्ण होते.












