ज्युनिअर गट जिल्हा ॲथलेटीक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे २ व ३ सप्टेंबर रोजी डेरवण येथे आयोजन

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्यावतीने ज्युनिअर गट जिल्हा ॲथलेटीक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि.२ व ३ सप्टेंबर या कालावधीत डेरवण क्रीडा संकुल, डेरवण ता. चिपळूण येथे आयोजित करण्यात आली आहे.
ज्युनिअर गटाची ही जिल्हा स्पर्धा १४, १६, १८ आणि २० वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आणि UID नंबर असलेल्याच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. यासाठी खेळाडूंनी UID नंबर काढणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी अविनाश पवार (८२७५६३५५३३) यांच्याशी संपर्क साधावा. UID नंबर काढण्यात काही अडचण असेल तर अजहर खलपे (७८२२९४२७४३) यांच्याशी संपर्क साधावा.
आपला प्रवेश अर्ज या https://forms.gle/3tWjy6LvpocWAMFd7 या लिंकवर निश्चित करायचा आहे. प्रवेश दि. २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत स्वीकारले जातील.
शनिवार दिनांक २ सप्टेंबर रोजी १८ व २० वयोगटाच्या तर रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी १४ व १६ वयोगटाच्या स्पर्धा होणार आहेत.
१४ वर्षाखालील गटात ११.११.२००९ ते १०.११.२००११ या कालावधीत जन्मलेले.
१६ वर्षाखालील गटात ११.११.२००७ ते १०.११.२००९ या कालावधीत जन्मलेले.
१८ वर्षाखालील गटात ११.११.२००५ ते १०.११.२००७ या कालावधीत जन्मलेले.
२० वर्षाखालील गटात ११.११.२००३ ते १०.११.२००५ या कालावधीत जन्मलेले.
१४ वर्षाखालील मुले व मुली – ६० मी., ६०० मी., लांबउडी, उंचउडी, गोळाफेक.
१६ वर्षाखालील मुले व मुली – १०० मी., ३०० मी., ८०० मी., २००० मी., लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक.
१८ वर्षाखालील मुले व मुली – १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी., ३००० मी., लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक.
२० वर्षाखालील मुले व मुली – १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी., ३००० मी., ५००० मी., १०००० मी., उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक.