लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील खेरवसे येथील श्री स्वयंभू शंकर देवालय खेरवसे च्या वतीने दि.२७ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
खेरवसे कुंभ्याचा माळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा घाटी आणि गावठी अशा दोन गटात घेण्यात आली आहे. घाटी गट स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रुपये ११००० आकर्षक ढाल तसेच द्वितीय क्रमांकाला ७००० व आकर्षक ढाल, तृतीय क्रमांक ला ५००० व आकर्षक ढाल, चौथ्या क्रमांकाला ३००० व आकर्षक ढाल आणि पाचव्या क्रमांकाला ३००० व आकर्षक ढाल अशी बक्षीसे दिली जाणार आहेत. त्या स्पर्धेसाठी ५०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. गावठी गटातील प्रथम विजेत्याला रुपये ७००० व आकर्षक ढाल, द्वितीय विजेत्याला रुपये ५००० व आकर्षक ढाल, तृतीय विजेत्यांना रुपये ३००० व आकर्षक ढाल, चौथ्या क्रमांकाच्या विजेत्याला रुपये दोन हजार व आकर्षक ढाल आणि पाचव्या विजेत्याला रुपये १००० व आकर्षक ढाल अशी बक्षीस दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी ४०० रुपये प्रवेश फि ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रभाकर गुरव-८७६७३८२४३४, प्रदीप खानविलकर-८५५२०९६४९५, भिकाजी धनावडे-९४०५९२५३८७, प्रथमेश खानविलकर-७७३८१२७४९३तसेच प्रकाश भालेकर, विजय जाधव, किरण गुरव, दिलीप गुरव, नितीन महाडिक यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.












