दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात

आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत

कुडाळ :
दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. आमदार निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हापरिषद उपाध्यक्ष दादा साईल, अरविंद करलकर, देवेंद्र नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर दशावतार कलाकारांना शासन दरबारी हक्काचा न्याय मिळाला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ट अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून त्यांनी आज पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे.
दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील हे अधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद करून त्यांना पुढील लाभ मिळावेत आणि एकही कलाकार या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाइन नोंदणी न करता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जिल्ह्यात येऊन काम करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी सभागृहात केली होती, त्यानंतरवाज संबंधित खात्याचे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पुढील काही दिवस जिल्ह्यात थांबून प्रत्येक तालुक्यात जाऊन हे अधिकारी दशावतार कलाकारांच्या भेटीगाठी घेऊन नोंद गोळा करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे स्वागत केले. यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.