कुणकवण, प्रतिनिधी :
भाजप नेते,खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कुणकवण च्या वतीने ग्रामस्थांसाठी विविध आरोग्य व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत १९ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत डॉ. प्रसाद गुरव (कणकवली) यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्रचिकित्सा (मोतीबिंदू) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
त्यानंतर २० जुलै रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत रक्त तपासणी शिबिर होणार असून, यामध्ये डायबेटीस, संपूर्ण रक्त गणना (CBC), किडनी कार्य, लिव्हर कार्य, कोलेस्टेरॉल आणि व्हिटॅमिन बी-१२ आदी तपासण्या करण्यात येणार आहेत.
याच दिवशी सकाळी १० वाजता कुणकवण गावातील ग्रामस्थांना मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रमही होणार आहे. हे सर्व उपक्रम कुणकवण शाळा क्रमांक १ येथे आयोजित करण्यात आले असून, त्याचा लाभ फक्त कुणकवण गावातील ग्रामस्थांना घेता येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.













