बांधकाम कामगारांच्या शैक्षणिक व सामाजिक सुरक्षा योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी

शिरगाव (प्रतिनिधी) :     महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना (आयटक)च्या वतीने जिल्हाध्यक्ष कॉ. संतोष तेली यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयात निवेदन सादर करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शैक्षणिक, मातृत्व, मृत्यू सहाय्य तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनात बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पूर्वीप्रमाणे मिळावा, तसेच योजनांअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय कामगारांची प्रलंबित नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज तातडीने निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.

Vvvयावेळी कॉ. मंगेश नारिंग्रेकर, कॉ. उमेश पवार, कॉ. विजय गुरव, कॉ. सचिन नरसाळे, कॉ. कमलाकर नारिंग्रेकर, कॉ. तुकाराम परब आणि कॉ. आनंद नारिंग्रेकर उपस्थित होते.