आ. दीपक केसरकर व आ. प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी:सावंतवाडी तालुक्यातील वैश्यवाणी ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तसेच यावर्षी विविध क्षेत्रांत उज्ज्वल कामगिरी केलेल्या ज्ञातीबांधवांचा सत्कार करण्यासाठी वैश्य समाज, सावंतवाडी आणि हिंदू वैश्यवाणी युवा संघटना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणगौरव सोहळा २०२६’ चे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा रविवार, दिनांक १९ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कळसुलकर इंग्लिश स्कूल, सभागृह, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपकभाई वसंतराव केसरकर आणि विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार उपस्थित राहणार आहेत.
या गुणगौरव सोहळ्याला सर्व ज्ञातीबांधवांनी आपल्या सपरिवार उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे व समाजबांधवांचे कौतुक करावे आणि सोहळ्याची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन हिंदू वैश्यवाणी युवा संघटना सावंतवाडीचे अध्यक्ष अमित
गवंडळकर, वैश्य समाज सावंतवाडीचे ज्येष्ठ समाजसेवक रमेश भाट आणि वैश्यवाणी महिला संघटना सावंतवाडीच्या अध्यक्षा सौ. तनुजा पोकळे यांनी केले आहे.












