शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा पुढाकार
सावंतवाडी :
माजी मंत्री तथा आमदार दीपक भाई केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेर्ले गावातील सर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाला गावातील शैक्षणिक संस्था आणि ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शैक्षणिक साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सावंतवाडी तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, उप तालुकाप्रमुख जीवन लाड, सावंतवाडी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, तसेच माजी सरपंच चंद्रकांत राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच विभागीय प्रमुख विनायक सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळा गावडे, सोमनाथ राऊळ, संजय घाडी, अनिल लिंगवत, माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ, सदा कदम आणि स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वेर्ले गावातील सर्व प्राथमिक शाळा आणि सर्व अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आमदार दीपक भाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल वेर्ले ग्रामस्थांनी आणि शाळा व्यवस्थापनाने समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.













