BREAKING: रत्नागिरीचा भावेश चव्हाण Re-NEET UG 2026 मध्ये ST प्रवर्गात राज्यात प्रथम; देशात चौथा क्रमांक

लातूरच्या संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याची उल्लेखनीय कामगिरी; ६६६ गुणांसह घवघवीत यश

रत्नागिरी : जिल्ह्यातील भावेश सुरेश चव्हाण याने Re-NEET UG 2026 परीक्षेत ST प्रवर्गात राज्यात प्रथम आणि देशात चौथा क्रमांक मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

 

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मार्फत २१ जून २०२६ रोजी घेण्यात आलेल्या Re-NEET UG परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेत लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या भावेशने ६६६ गुण मिळवत AIR-650 प्राप्त केला. Re-NEET परीक्षेत ST प्रवर्गात हा राज्यातील सर्वोच्च आणि देशातील चौथा क्रमांक ठरला आहे.

महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा Re-NEET परीक्षेसाठी २०३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले असून भावेश चव्हाणच्या यशाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला आहे.

भावेश हा रत्नागिरीचा सुपुत्र आहे

रत्नागिरीच्या सुपुत्राने राष्ट्रीय स्तरावर केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.