देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव संचलित ‘इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली’ने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा यंदाही दिमाखात कायम राखली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या बी. फार्मसी अंतिम वर्षाच्या (Fourth Y. B. Pharm Sem VIII Examinations 2026) परीक्षेत महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी महाविद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह परीक्षेत यश मिळवले आहे:
प्रथम क्रमांक: पवार अर्पिता जितेंद्र (८.५५ SGPA) आणि शिंदे प्राची सुभाष (८.५५ SGPA)
द्वितीय क्रमांक: पिंपळे साहिल कृष्णा (८.३७ SGPA), पाटील सिद्धी राजेंद्र (८.३७ SGPA) आणि कापले दिव्या दिलीप (८.३७ SGPA)
तृतीय क्रमांक: होस्कोटे साक्षी सतीश (८.२८ SGPA)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने साहेब आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल बी. खाडे यांनी या यशाबद्दल सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच, महाविद्यालयाला सातत्याने मिळणाऱ्या भक्कम पाठिंब्याबद्दल आणि अमूल्य प्रोत्साहनाबद्दल त्यांनी संस्था व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले.
यशाची प्रमुख वैशिष्ट्ये:
या उल्लेखनीय यशाचे श्रेय प्रामुख्याने खालील बाबींना दिले जात आहे:
विद्यार्थ्यांची जिद्द आणि अपार मेहनत
अनुभवी प्राध्यापक वर्गाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन
महाविद्यालयातील नियमित व दर्जेदार अध्यापन
अद्ययावत आणि सुसज्ज प्रयोगशाळांची सुविधा
महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाकडुन निकाल जाहीर होण्याआधीच २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नामांकित फार्मा कंपन्यामंध्ये निवड झाली असून, या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.











