मसुरे | झुंजार पेडणेकर : चाफेखोल तोरसोळे शाळेत रानभाज्या प्रदर्शन व विक्री उपक्रमराबविण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ दिपाली दिपक पताने, श्री मिलिंद जाधव, दिपक पताने, सुरेश कदम, सुप्रिया हडकर, संकेत हडकर, श्रद्धा जाधव, दशरथ बांदल, दर्शना बांदल, प्रथमेश परब, स्मिता शिंदे , सीमा जाधव, आनंदी खांदारे, मुख्याध्यापक श्रीम मनिषा ठाकर, शिक्षक श्री सुयोग धामापूरकर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अळू, टायकुळा, शेवगा, कुरडू, पेवगा, एक पानी भाजी, घोट्याचे वेल ,भारंगी, चवई फुल, कुड्याच्या शेंगा, अळंबी, सुरण आदी रानभाज्या विक्री साठी उपलब्ध होत्या.












