सचिव पदी प्रणव नाडकर्णी तर खजिनदारपदी विनय गावडे
सावंतवाडी । प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर अखत्यारित असलेल्या निरवडे गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी नागेश गावडे,सचिव पदी प्रणव नाडकर्णी, तर खजिनदारपदी विनय गावडे यांची एका मताने निवड करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारणीचे निरवडे ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे.
निरवडे येथे आज पार पडलेल्या ग्रामसभेत उपसमितीचि कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. निरवडे गावचे देवस्थान श्री देव भूतनाथ पंचायतन देवस्थान यांच्या व्यवस्थापन समितीची ही कार्यकारणी आहे. नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष नागेश गावडे,सचिव प्रणव नाडकर्णी तर खजिनदारपदी विनय गावडे यांची निवड करण्यात आली. तर सदस्य पदी भगवान गावडे, शंकर गावडे, दिनकर गावडे, लवू गावडे, शांताराम उर्फ निखिल माळकर, शिवराम मेस्त्री, महादेव पवार, बाबुराव जाधव, श्रीकृष्ण बांदिवडेकर, मुकुंद बाईत शामसुंदर बर्डे, प्रकाश भाईडकर आदींची निवड करण्यात आली आहे.
या ग्रामसभेमध्ये पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर कार्यालय प्रमुख शितल इंगवले सावंतवाडी उपसमिती लिपिक बाळकृष्ण ननवरे सावंतवाडी उपविभाग लिपिक सचिन बांदेकर निरवडे सरपंच सुहानी गावडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर ग्रामविकास अधिकारी सुनीता कदम प्रभारी पोलीस पाटील रोशनी जाधव तलाठी नमिता कुडतरकर, माजी सरपंच प्रमोद गावडे संतोष गावडे चंद्रकांत गावडे मधुसूदन गावडे बाबुराव गावडे हरी वारंग दशरथ मल्हार धर्माजी गावडे संजू गावडे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने निरवडे ग्रामपंचायतिला उपसमिती नियुक्ती बाबतचे आवाहन करण्यात आले होते समितीच्या व्यवस्थापनाखाली मंदिराची वार्षिक यात्रा जिर्णोद्धार दैनंदिन व्यवस्थापन आदी गोष्टींसाठी उप समिती कार्यरत असणे आवश्यक असते त्यानुसार जिल्हाधिकारी तथा समितीच्या प्रशासकांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या गावातील उपसमत्यांची मुदत संपली आहे त्या गावांनी गुरुवारी होणाऱ्या ग्रामसभेत नियमावलीनुसार उपसमिती स्थापन करा असे आवाहन केले होते त्यानुसार आज ग्राम सभेत श्री देव भूतनाथ पंचायतन देवस्थान उप समितीची निवड करण्यात आली आहे या ग्रामसभेला ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते या झालेल्या नूतन कार्यकारणीचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले व अध्यक्ष नागेश गावडे यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












