मसुरे | झुंजार पेडणेकर
कोकणातील रानभाज्या या आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा, आरोग्याचा आणि जैवविविधतेचा अमूल्य ठेवा आहेत. या रानभाज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व दशक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांना समजावे, त्यांचे संवर्धन व्हावे आणि त्यांच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सोमवार २७ जुलै २०२६ रोजी पळसंब येथे श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा,मंडळाच्या वतीने भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व माहिती देण्यात येणार आहे.तसेच रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.या स्पर्धेत प्रथम विजेत्याला रोख रक्कम 2000,द्वितीय विजेत्याला रोख रक्कम 1500 आणि तृतीय क्रमांकाला 1000 रूपयाचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.तसेच सहभागी नागरिकांना सन्मानपत्र दिले जाणार आहे. याशिवाय रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म व उपयोग याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या महोत्सवाला शेतकरी, महिला बचत गट, युवक-युवती, विद्यार्थी, गृहिणी आणि सर्व निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाकडून करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर(9422232489) आणि अमित पुजारे(942040591यांना संपर्क करावा.स्पर्धा आणि महोत्सवात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत आणि सदस्यांनी केले आहे.













