डीकॅड महाविद्यालयाने पटकावली ७ कलाप्रकरात ५ बक्षिसे

देवरुख (प्रतिनिधी) क्रेडार संचलित DeCAD देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन या कला महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या ५६व्या युवा महोत्सवाच्या गोगटे जोगळेकर रत्नागिरी येथे झालेल्या प्राथमिक फेरीत फाईन आर्ट या विभागातील ७ कलाप्रकरात ५ बक्षिसे मिळवून चमकदार कामगिरी केली तसेच विद्यापीठाच्या मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामधे साई सनगरे याने कोलाज स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर ऑन धिस स्पॉट पेंटिंग या स्पर्धेत प्रियांशु मिठागरी याने प्रथम तर कार्टुनींग मध्ये अमोघ रेळेकर याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. क्ले मॉडेलिंग या स्पर्धेत प्रज्वल सनगरे याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. निकी बाणे हिला रांगोळी स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले आहे . या युवा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अजय पित्रे, सौ.भारती पित्रे, सेक्रेटरी वीरकर व कला महविद्यालयाचे प्राचार्य मराठे, सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.