वेंगुर्ले येथे २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…

वेंगुर्ले : प्रतिनिधी वेंगुर्ले येथे बुधवार दि. २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला, हनुमान मित्र मंडल जुना स्टँड वेंगुर्ला, छत्रपती मित्र मंडल कॅम्प वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान तुळस आणि बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने बॅ. खर्डेकर महाविद्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदानाला ‘सर्वश्रेष्ठ दान’ मानले जाते. आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्या गरजू रुग्णाला नवीन जीवन देऊ शकतो. सध्याच्या काळात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, आपल्या सर्वांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे सामाजिक भान जपून आपण सर्वांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब यांनी केले आहे.