बँक व सर्वसामान्य नागरिकांचे नाते हे विश्वासाचे असले पाहिजे. बँकेचा समाजाच्या विकासामध्ये सहभाग असला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी योजना राबवत आहे. सिंधुदुर्गच्या जिल्ह्यामध्ये आर्थिक विकासाचा वाटा जिल्हा बँकेचा असेल असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते तळेबाजार येथील जिल्हा बँकेच्या एटीएम सेंटरचा शुभारंभ करण्यात आला जिल्हा बँकेचे हे 41 वे एटीएम सेंटर आहे यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी माजी आमदार अजित गोगटे संचालक एडवोकेट प्रकाश बोडस, विठ्ठल देसाई देवगड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष भाई आचरेकर व अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना मी आमदार अथवा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून येथे आलो नसून मी बँकेचा सर्वसामान्य संचालक म्हणून आलो आहे संचालक व नागरिकांमध्ये अथवा सर्वसामान्यांमध्ये अंतर असू नये याची काळजी आम्ही घेत आहोत सर्वांशी समन्वय साधून तुम्हाला हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा बँकेचा मानस असून एटीएम सेंटर हा त्यातीलच एक भाग आहे बँक यापुढे अशीच लोकोत्तर प्रगती करत राहील असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला यावेळी अनेक मान्यवरांनी भाषणे केली
तळेबाजार येथील विश्वास सावंत, नलाराम कदम, नागेश दूखंडे, सतीश तोरस्कर, उत्तम सुतार यांना जिल्हा बँकेची एटीएम कार्ड वितरित करण्यात आली तळे बाजारातील अनेक नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते











