खेड (प्रतिनिधी) खेड न्यायालयातील सरकारी वकील स्मिता कदम यांची चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे दिवाणी न्यायाधीश आणि प्रथम वर्ग १ पी. आर. कुलकर्णी यांच्या न्यायालयात विशेष सहाय्यक अभियोक्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
१ फेब्रुवारीपासून त्या चिपळूण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. आर. कुलकर्णी यांच्या न्यायालयात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यालयात हजर झाल्या आहेत. कोल्हापूर येथे विधी पदवी घेतलेल्या अॅड. कदम यांची मूळ गाव असलेल्या चिपळूणला १३ वर्षांनी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची चिपळूण येथे बदली झाल्याबद्दल येथील न्यायालयातील सरकारी वकील मृणाल जाडकर व अन्य कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. स्मिता कदम यांनी आपल्या २०११ पासून चिपळूण, गुहागर रत्नागिरी, दापोली मंडणगड, नंतर खेड न्यायालयातील आपल्या कार्यकाळात अनेक सामाजिक राजकीय, संवेदनशील, जटील सत्कार प्रकरणे सोडवून कार्यकर्तृत्वाची उत्तमप्रकारे छाप उमटवली होती.










