करवीर तालुक्यातील हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाच्या रॅकेटवर करवीर पोलिसांची धडक कारवाई…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर : करवीर तालुक्यात सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाच्या रॅकेटवर करवीर पोलिसांनी धडक कारवाई करत लॉज मालकाला अटक केली आहे. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्राहक बोलावून लॉज मध्ये कुंटण खाना चालवत जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे अवैद्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध्य वेश्या व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार करवीर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे.याच महिन्यातील ११जुलै रोजी वाशी गावच्या हद्दीतील सनराईज लॉजिंगवर छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या महिलेची पोलिसांनी सुटका केली होती.त्या प्रकरणी लॉज वरील कामगार व एजंटांसह तीन आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासादरम्यान आरोपी शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याने पीडित महिलेला कोल्हापुरात आणून कणेरेवाडी येथील स्वयंभू लॉज मध्ये ठेवले असल्याचे समोर आले.या ठिकाणी लॉज मालकासोबत संगनमत करून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्राहक बोलावून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी स्वयंभू लॉजचा मालक अमोल श्रीपती खोत (वय ४०, रा.कणेरीवाडी) याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुप्त माहिती पासून सुरू झालेल्या कारवाईत पोलिसांनी केवळ छापा टाकून न थांबता तपासाची साखळी पुढे नेतमीरॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचत लॉज मालकाला अटक केली. करवीर पोलिसांच्या सतर्क तपासामुळे आणि धडाकेबाज कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.