भुईबावडा : भुईबावडा गावठण येथील रहिवासी सौ. अश्विनी अरविंद मोरे (वय ४७) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भुईबावडा गावठण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सौ. अश्विनी मोरे या प्रेमळ, मनमिळावू व सुस्वभावी म्हणून परिचित होत्या. सामाजिक कार्यकर्ते अरविंद मोरे यांच्या त्या पत्नी होत. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी सर्वांशी आपुलकीचे संबंध जपले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दीर, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत असून, मोरे कुटुंबीयांच्या दुःखात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.













