मसुरे देऊळवाडा येथे 6 ऑक्टोबर रोजी नवचंडीयाग 

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे देऊळवाडा येथील श्री देवी माऊली मंदिर येथे 6 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता नवचंडीयाग आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी 7.30 पासून ओटी भरणे तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून दुपारी दोन वाजता महाप्रसाद होणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.