यापुढे बघुया निधी मागणारा थकतो.. की देणारा : आ. नितेश राणे यांचे भाजपा तालुकाध्यक्षांना खुले आव्हान

यापुढे बघुया निधी मागणारा थकतो.. की देणारा : आ. नितेश राणे यांचे भाजपा तालुकाध्यक्षांना खुले आव्हान

वैभववाडी प्रतिनिधी
गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी यापुढे निधी कमी पडणार नाही. तालुकावासियांनी यापुढे निधीची मागणी करत राहायची. गावातील विकासकामांच्या याद्या तयार ठेवा. मला पण बघायचे आहे. आता कोण थकतो. मागणारा थकतो… की देणारा थकतो. असे खुले आव्हानच नितेश राणे यांनी वैभववाडी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांना दिले.
तिथवली येथील ग्रामसचिवालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते. विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांनी निधी वाटपात माझ्या मतदारसंघावर अन्याय केला. तरीदेखील मतदारांनी माझी साथ कधीच सोडली नाही. यापुढे जे मागाल ते तुम्हाला मिळणार. असा शब्द आमदार नितेश राणे यांनी वैभववाडीतील जनतेला दिला आहे.