पारंपारिक कारागिरांसाठी पीएम विश्वकर्मा योजना भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
कुडाळ प्रतिनिधी
केंद्र शासनाने पीएम विश्वकर्मा ही योजना पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांसाठी आणली असून या योजनेचा फायदा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कारागिरांना होणार आहे अशा प्रकारची योजना राबवून समाज घटकातील प्रत्येक गावाला सामावून घेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत असल्याबाबत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कुडाळ भाजप कार्यालय येथे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की या योजनेमधून पारंपारिक कारागरांसाठी ५ टक्के दराने कर्ज पुरवठा होणार आहे यामध्ये पारंपारिक कारागीर पुन्हा जिवंत व्हावे त्यामधून त्यांचा उदरनिर्वाह सुरू राहावा हा हेतू योजनेमागे आहे या योजनेसाठी १३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याचा फायदा आपल्या जिल्ह्यातील कारागिरांना व्हावा यासाठी भाजपच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत असे माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, उद्योजक विशाल परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश कानडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम तसेच सर्व नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो माजी खासदार निलेश राणे











