रत्नागिरी :
आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन पुणे यांच्या तर्फे २०२६ चा दिला जाणारा राष्ट्रीय गौरव पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, जालगाव येथील डॉ. प्रशांत परांजपे यांना आज दिनांक २३ जुलै २०२६ रोजी पुणे येथील महानगरपालिकेच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला
डॉ . प्रशांत परांजपे हे लेखक,पत्रकार, पर्यावरण अभ्यासक , साहित्यिक, संग्राहक, व्याख्याते ,पर्यटन व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत.
ते निवेदिता प्रतिष्ठानचे माध्यमातून पर्यावरण संवर्धन, सामाजिक आणि युवा प्रबोधन , मनोधैर्य योजना , अनाथांसाठी मायेची चादर आदी उपक्रम सातत्याने सुरू असतात. रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या पालघर, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक आदी राज्यातील सहकारी संस्थांच्या सहाय्याने पर्यावरण संवर्धनात विविध उपक्रम राबविण्यात येतात.
कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेटसह राज्यस्तरीय आदर्श पत्रकारितेचे पुरस्कार त्याचप्रमाणे सामाजिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विशेष अनेक सन्मान प्राप्त आहेत.
यशदा पुणे अंतर्गत घनकचरा आणि जल व्यवस्थापन या विषयातील ते तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहतात.शाश्वत पर्यावरण विकास या विषयावर महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या माध्यमातून जनप्रबोधन करतात
कायद्याचे म्युझियम: दापोली पोलीस ठाण्यात त्यांनी ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिले ‘इको-फ्रेंडली कायदा म्युझियम’ उभारले आहे. याद्वारे पर्यटकांना आणि नागरिकांना वाहतूक नियम, पोक्सो कायदा, आणि अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी संदेश दिला जातो. महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक दापोली चे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.
पर्यावरण विषयी संस्था फेडरेशन महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक म्हणूनही ते काम पाहतात.
जल, जमीन आणि जंगल संवर्धन या विषयात डॉ. परांजपे यांचे विशेष योगदान आहे.
मनुष्य पाणी निर्माण करू शकतो आणि पोषक माती तयार करू शकतो हे त्यांचे यावर्षीचे प्रमुख संशोधनाचे विषय आहेत.
डॉ. परांजपे यांच्या पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०२६ चा राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.













