पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त न.प. सफाई कर्मचाऱ्यांना धान्यवाटप

सावंतवाडी । प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई कामगारांना धान्य वाटप करण्यात आले. सावंतवाडी शहराचे रियल हिरो असलेल्या या कर्मचार्‍यांना एक थोडासा हातभार द्यावा या उद्देशाने त्यांना लागणारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पुंडलिक दळवी यांची कन्या श्रिया दळवी हिच्या हस्ते करण्यात आले.
दोन महिन्याचे वेतन झालेले नसल्याने सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी अलिकडेच एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले होते. मात्र, सावंतवाडी शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने नागरिकांना वेठीस न धरण्याच्या विनंतीला मान देऊन ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले. आजही ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशाप्रकारे सफाई कर्मचारी आर्थिक टंचाईग्रस्त असून त्यांना आपला चरितार्थ चालवणे देखील कठीण झालेले आहे. त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून पुंडलिक दळवी यांनी सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी राष्ट्रवादीचे सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, तालुका सरचिटणीस राकेश नेवगी, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, उद्योग व्यापार सेलचे तालुका उपाध्यक्ष याकूब शेख आदी उपस्थित होते.