मिलाग्रीसचा चैतन्य गावडे ९९ टक्क्यांसह तालुक्यात प्रथम
कळसूलकरचा पार्थ वाडकर द्वितीय, तर मळगावची सुचित्रा धुरी तृतीय
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९८.६१ टक्के लागला आहे. सावंतवाडी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १७२७ विद्यार्थ्यांपैकी १७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९३६ पैकी ९२३ विद्यार्थी तर ७९१ पैकी ७८७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. यामध्ये तालुक्यात मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीचा चैतन्य गावडे ९९ टक्के गुण मिळवत प्रथम आला आहे. तर कळसूलकर इंग्लिश स्कूलचा पार्थ वाडकर ९७.८० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर मळगाव हायस्कूलची सुचित्रा धुरी ९७.६० टक्के गुण मिळवीत तालुक्यात तिसरी आली आहे.