नाटे परिसरातील शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

दोन ग्रामपंचायत सदस्यांसह उबाठा शाखाप्रमुखांचाही पक्षप्रवेश
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थित केला पक्ष प्रवेश

जैतापूर (वार्ताहर): राजापूर–लांजा–साखरपा मतदारसंघात आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातुन होणारा विकास आणि कामांची होणारी पुर्तता यामुळे तालुक्यातील विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आ. सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा ध्वज हाती घेत आहेत. राजापूर तालुक्यातील नाटे येथील ठाकरेवाडी, पडवणे, बाणेवाडी, थळेश्री मिराशीवाडी तसेच परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना उबाठा गटाच्या ग्रामपंचायत सदस्या ज्योती मयेकर व प्रांजल लकळे, तसेच उबाठाचे शाखाप्रमुख चंद्रकांत मिराशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या सर्वांचे पक्षात स्वागत करताना आ. सामंत यांनी आपल्या सगळयांचा योग्य सन्मान केला जाईल अशी ग्वाही देतानाच या परिसराच्या विकासाला भविष्यात अधिक गती दिली जाईल असे नमुद केले.
नाटे येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख दीपक नागले, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्या कोमल नवाळे, पंचायत समिती सदस्या जान्हवी गावकर, चंद्रकांत पड्यार, शिवसेना नेते रवींद्र नागरेकर, गिरीश करगुटकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नाटे गावातील ग्रामस्थांनी आ. सामंत यांच्याशी थेट संवाद साधत गावातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा, सार्वजनिक प्रश्न तसेच प्रलंबित कामांबाबत निवेदने सादर केली. प्रत्येक निवेदन गांभीर्याने ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या. काही प्रश्नांवर जागेवरच कार्यवाही करण्याचे आदेश देत जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश आ. सामंत यांच्याकडून देण्यात आले.
यावेळी परेश लकळे, गणेश पारकर, अक्षय मयेकर, सिद्धात शेट्ये, विकी शेट्ये, दिवा पेडणेकर, राजेश ठाकरे, प्रसाद आरेकर, मनीष मसुरकर, नितेश ठाकरे, प्रणय कलव, श्रीकृष्ण पेडणेकर, प्रवीण होलम, रवी मयेकर, नितीन करंगुटकर, दीपाली मयेकर, नेहा करंगुटकर, शीतल कलव, सुगंध ठाकरे, पप्या आंबोळकर, यश आंबोळकर, नितेश आंबोळकर, निलेश आंबोळकर, विशाल आंबोळकर, हेमनाथ आंबोळकर, स्वयंम आंबोळकर, सानिया आंबोळकर, सपना ठकरूळ, जगदीश ठकरूळ, संदीप ठकरूळ, सुगंधा आंबोळकर, निशा पवार, विशाखा सातूर्डेकर, दिक्षा वाघे, प्राची कलव, हिराबाई पवार, रुपाली सागवेकर, रेखा प्रजापती, रेखा पवार, सानिया कोठारकर, रेखा नार्वेकर, विशाखा वाडेकर, माधुरी ठाकरे, विजय पारकर, वंदना पारकर, विशाखा पारकर, प्रमिला नार्वेकर, सीताबाई मेळेकर, संदेश आंबोळकर, मयुरी आंबोळकर, राजू गिजम, नितीन घाडी, नितीन बाणे, महेश घाडी, जितू बाणे, लहू साळवी, लहू कानू साळवी, अभिजित थळेश्री, परेश मिराशी, निधी मसुरकर, मेघना ठाकरे, सुधा ठाकरे, भारती कलव, श्रीनिवास हळदणकर, रामदास कलव, जितू शिरवडकर, आंबोळगडचे माजी उपसरपंच शत्रुघ्न वाडेकर, ज्येष्ठ समाजसेवक विश्वासभाई करंगुटकर, अनिल नार्वेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी विभागप्रमुख मनोज आडविलकर, उपविभागप्रमुख प्रेमानंद कलव, रमेशशेठ लांजेकर, संतोष चव्हाण, शाखाप्रमुख विद्याधर कांबळी, अनिल ठाकरे, मंगेश पारकर, अल्केश पवार, संदेश शेठ पाथरे, रोशन डुगीलकर, सचिन कोठारकर, रुपेश मिराशी, बंड्या चव्हाण, दीपक पावसकर, अजय बंदरकर, महिला उपतालुकाप्रमुख प्राजक्ता पांचाळ, अंकिता मयेकर, पूजा करंगुटकर, भार्गवी नार्वेकर, मनीषा पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.