रत्नागिरी : ग्रुप ग्रामपंचायत कोंडगाव तर्फे घेण्यात आलेल्या आॉनलाईन जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत अ गट( इयत्ता १,२,३)गटा मधून अर्थ हेमंत बेर्डे याने प्रथम क्रमांक पटकवला आहे.
अर्थ ७ वर्षाचा आहे. अर्थ हेमंत बेर्डे हा श्रीमती अरुधंती अरुण पाध्ये इंग्लिश मिडियम स्कुल चा विद्यार्थी आहे.या स्पर्धेसाठी तब्बल २२०स्पर्धकांचा सहभाग लाभला. अ गटामध्ये ६१स्पर्धकांचा सहभाग लाभला . अर्थ च्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे..
त्याचे कला शिक्षक सुरज मोहिते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यास मिळाले..









