कै.प्रणील धोपटे यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून सांत्वन

देवगड,  : जामसांडे येथील मखरवाडी परिसरातील ग्रामस्थ तथा उत्तम कबड्डीपटू प्रणील धोपटे यांच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी धोपटे कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

 

यावेळी ना. नितेश राणे यांनी प्रणील धोपटे यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत कुटुंबीयांना धीर दिला. दुःखाच्या या कठीण प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला.

 

प्रणील धोपटे हे कबड्डी क्षेत्रातील गुणी आणि होतकरू खेळाडू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे क्रीडा क्षेत्रासह जामसांडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या भेटीमुळे धोपटे कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाला.