अपघातात मृत्यू झालेल्या मिलिंद घाडी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून सांत्वन

देवगड, : देवगड-नांदगाव मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या तळवडे घाडीवाडी (ता. देवगड) येथील मिलिंद शामराव घाडी यांच्या कुटुंबीयांची सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

 

यावेळी ना. नितेश राणे यांनी मिलिंद घाडी यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 

मिलिंद घाडी यांचा देवगडहून जामसंडेकडे जात असताना डॉल्फिन बिअर शॉपीसमोरील देवगड-नांदगाव मार्गावर अचानक रस्त्यावर आलेल्या गायीला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसून अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.