गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा; मंडणगड येथे दिवाणी न्यायालय

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय ( संक्षिप्त)

मुंबई : राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव

( आदिवासी विकास विभाग)

गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा

(अन्न व नागरी पुरवठा)

आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार

(कौशल्य विकास )

मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी

( महसूल विभाग)

महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द

( गृह विभाग )

केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला

( महिला व बाल विकास)

सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे

( सहकार विभाग )

दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन

( विधी व न्याय विभाग )

मंडणगड येथे दिवाणी न्यायालय

( विधी व न्याय विभाग)