चिपळूण (प्रतिनिधी) : शहरालगत असणाऱ्या खेर्डी गावातील दत्तवाडी मित्र मंडळ खेर्डी यांच्यावतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. वाडीतील मुलांचे गुणगौरव करावे व त्यांना शाबासकी द्यावी व त्यांच्या भविष्याचा वेध घेता यावा, या भावनेने दरवर्षी दत्तवाडीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात येतो. ज्ञान, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा हा अभिमानाचा क्षण होता. या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देताना वाडीतील ग्रामस्थ महिला मंडळ व कार्यकारी कमिटी दत्तवाडी मित्र मंडळ व पदाधिकारी. या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणाऱ्या सर्व मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांचे मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
“आजचा सन्मान… उद्याच्या उज्ज्वल भविष्याची प्रेरणा!” सदर कार्यक्रमास दत्तवाडी मित्र मंडळचे अध्यक्ष सतीश शिंदे, माजी अध्यक्ष पांडुरंग गुजर, उपाध्यक्ष अजिंक्य पवार कार्याध्यक्ष पांडुरंग अण्णा कुंभार सचिव दिगंबर सुर्वे,, रिटायर सर्कल अधिकारी नार्वेकर साहेब, समीर कदम, रमेश शिंदे साहिल जाधव, रमाकांत सावंत, अभिजीत पाटणकर, माजी सरपंच वृंदा दाते, गीतांजली सावंत, यादव, खरात, कांबळे, श्रीमती शितल सुर्वे, संगीता शिंदे, सोनल देसाई आदी दत्तवाडी ग्रामस्थ व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.












