अभय सहस्त्रबुद्धे यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड

कलगी-तुरा समाजोन्नती मंडळ समन्वय समितीची नवी कार्यकारिणी जाहीर
चिपळूण (वार्ताहर) : कलगी-तुरा समाजोन्नती मंडळ समन्वय समितीची सभा रविवारी दि. २६ जुलै परशुराम येथील अभय सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली. या सभेत सन २०२६-२९ या कालावधीसाठी समितीच्या नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनुसार अभय सहस्त्रबुद्धे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी मोहन घडशी आणि चंद्रकांत गोताड, सरचिटणीसपदी सुधाकर मास्कर, चिटणीसपदी शाहिद खेरटकर व ज्ञानदीप भोईनकर, तर खजिनदारपदी जयंत (बापू) चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून अनंत तांबे, चंद्रकांत धोपट, दिलीप नामे, भारदे गुरुजी, देवजी हरमले गुरुजी, विष्णू माडवकर, सुनिल धुमक, शांताराम शिंदे, मनोहर सुकम, मंगेश शिगवण, संभाजी तावडे, दत्ताराम आयरे, उमेश पोटले आणि संतोष हातणकर यांची निवड करण्यात आली. मुंबई, रायगड, चिपळूण, देवरुख, लांजा आणि राजापूर येथील संलग्न मंडळांचे अध्यक्ष व सरचिटणीस हे समन्वय समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
यामध्ये सुरेश ऐनारकर, संतोष धारशे, चंद्रकांत पालकर, रवींद्र कोटकर, शांताराम मालप, पांडुरंग जंगम, वैभव पवार आणि भालचंद्र दामा यांचा समावेश आहे. सभेत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविणे, विविध मंडळांमध्ये अधिक समन्वय साधणे आणि समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.