मुंढर ग्रामदेवता रस्ता व आडी-ओळवण रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा 2 रोजी भूमिपूजन सोहळा

मोडकाआगर वार्ताहर:

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद सिताराम गांधी यांच्या मागणीनुसार मुंढर ग्रामदेवता रस्ता तसेच आडी-ओळवण रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा दि.सोमवार, २ नोहेंबर २०२६ रोजी संपन्न होणार आहे.मुंढर ग्रामदेवता मंदिर येथे भूमी पूजन सकाळी १० वा.
मुंढर आडी-ओळवण रस्ता
सकाळी ११वा. होणार आहे.
तरी सर्व ग्रामस्थांनी या भूमिपूजन सोहळ्यास मोट्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती
जिल्हा परिषद सदस्य प्रमोद सिताराम गांधी यांनी केली आहे.