गुहागरमध्ये भरदुपारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; दुचाकीस्वार पसार, पोलिसांत गुन्हा दाखल

गुहागर:

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात आरे ते पाटपन्हाळे रस्त्यावर जबरी चोरीची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वाकी स्वातंत्र्यवाडी येथील रहिवासी सौ. अवनी समीर पागडे (वय ३६) या वाकी पिंपळवट सीमा येथील आपले किराणा मालाचे दुकान बंद करून मुलीला शाळेतून आणण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाचा रेनकोट व डोक्यावर हेल्मेट घातलेला एक अज्ञात दुचाकीस्वार तेथे आला. त्याने पागडे यांच्या गळ्यातील अंदाजे २५,००० रुपये किमतीचे, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक पदरी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि पाटपन्हाळ्याच्या दिशेने पळ काढला. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.